BMC election 2022 congress upset over mumbai wards revised boundaries nana patole warned to go court mhds
नागपूर, 18 मे : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका (BMC Election 2022) जाहीर होण्यापूर्वी वॉर्ड पूर्नरचनेवरुन महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष (Congress Party) नाराज असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाकडून उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याच दरम्यान आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक मोठं विधान केलं आहे. तसेच थेट कोर्टात जाण्याचं आव्हान केलं आहे. नाना पटोले यांनी म्हटलं, आघाडीचं सरकार असताना सर्व पक्षांनी एकत्र येऊनच वॉर्ड रचना करायला हवी. आपण सोबत राहून जर आपल्या मित्र पक्षाचं नुकसान होत असेल तर ते बरोबर नाही. त्यामुळे आमच्या स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यामध्ये असो… आम्ही अनेक ठिकाणी कोर्टात गेलो आहोत. आमची मागणी दोन प्रभागांची होती पण तीनचा प्रभाग करण्यात आला. मुंबईत असेल, पुण्यात असेल… अनेक ठिकाणी जर आपल्या सोयीनुसार महाविकास आघाडीतील पक्ष जर प्रभाग बनवत असतील तर कोर्टात न्याय मागण्याची आमची भूमिका आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. वाचा :
“राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात घोडेबाजार, आकडे आणि मोड दोन्ही…” म्हणत शिवसेनेने घेतला मोठा निर्णय मुंबईत जवळपास 45 ते 50 वॉर्डमध्ये शिवसेनाला फायदा होईल अश्याप्रकारे बदल केले आहेत अशी राजकिय वर्तृळात चर्चा आहे. यापैकी 17 ते 18 वॉर्डमधील बदलांचा थेट फटका काँग्रेसला बसेल अशी स्थिती आहे. माझा स्वत:च्या वॉर्डमध्ये बरेच फेरबदल झाले, हे बदल जाणूनबुजून केले असल्याचे दिसते आहे असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. वॉर्ड पुर्नरचनेसंदर्भात काँग्रेसच्या जागांबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई काँग्रेसची बैठक भाई जगतापांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात आली. काँग्रेसच्या मुंबई महापालिकेतील जागांवर वॉर्ड पुर्नरचनेमुळे किती परिणाम होणार याचा अभ्यास काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत झाला आणि त्यानंतर भाई जगताप यांनी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही असं म्हटलं. तसेच वार्ड पुनर्रचनेत बदल झाले आहेत परंतु जे आरोप करताय त्यांनी 2017 साली तुम्ही काय केले ते आठवा … 9 वार्ड मध्ये थोडाफार फटका बसेल परंतु आमच्यात नाराजी नाही अशी भूमिका घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :